कुलस्वामिनी तुळजाभवानी
*तुळजापूरची तुळजाभवानी* 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 *उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून २६०० फुट इंच असून येथील भवानी मातेचे मंदीर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले आहे. या डोंगराचे पुराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते. कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले.छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदेवता. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.एवढेच नव्हे तर मातेचे भक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत. हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत*. *उस्मानाबाद - तुळजापूर अंतर 22 कि.मी. आहे.व सोलापूर येथून ४५ कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव,मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट...