Posts

Showing posts from 2016
Image
🌹 *सर्व मंगल मांङल्ये शिवे सर्वार्थ साधिके,* *शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते* 🌹 आई राजा....उदो...उदो.... *"आजपासुन सुरू होणा-या शारदिय* *नवरात्रोत्सवाच्या आपणास व आपल्या* *परिवारास  हार्दिक शुभेच्छा*💐 *कुलस्वामिनी देवी श्री  तुळजाभवानी कृपेने आपणास* *उत्त्तम आरोग्य, सुख, शांती, समृद्धि* *आणि समाधान लाभो हिच आई* *कुलस्वामिनी देवी श्री  तुळजाभवानीच्या चरणी मनापासुन प्रार्थना* *सुहास श्रीरंग कोळेकर ,तुळजापुर* zpprimaryschoolkayre.blogspot.in suhaskolekar.blogspot.in
गणेशोत्सवात शोधते बालपणाचे सोनेरी दिवस! - कोमल गावडे, फलटण    मंगळवार, 6 सप्टेंबर 2016 - 12:49 PM IST Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=EAXBGA ...

" ती " आणि " मी "....!

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (८) तुमचा अभिषेक  | 8 October, 2013 - 11:36 २ ऑक्टोबर २०१३ . . तापलेल्या तव्यावर चरचरणार्‍या मच्छीचा वास.. स्वयंपाकघरातून दिवाणखान्याला चकमा देत, चुरचुरत थेट, बेडरूममध्ये माझ्या नाकाला झिणझिण्या द्यायला आत शिरला.. अन दिवसभराच्या कामाचा अर्धा थकवा तिथेच पळाला. श्रावणापाठोपाठ गणपती अन त्यामुळे थंडावलेला मत्स्याहार.. जर आजचा हा वार चुकला तर पुढचे काही दिवस नवरात्री निमित्त पुन्हा जिभेला लगाम घालावा लागणार हा विचार खायची इच्छा आणखी प्रबळ करून गेला.. अर्थात बाहेर हॉटेलात खायला तेवढी परवानगी होती, पण तिथे घरची, आईच्या हातची चव कुठे येणार.. ते नेहमीच ताकाची तहान दूधावर वाटते मला.... म्हण मुद्दामच उलटी म्हटली कारण दूधापेक्षा ताकच जास्त आवडते मला.. रात्रीचे दोन घास कमीच खायचे असतात, हे मानून आणि पाळूनही आज चार घास जास्तच गेले. तळलेली मच्छीची तुकडी आणि सारभात असले की हे माझे नेहमीचेच आहे, पण आजवर ना कधी मळमळले ना कधी अजीर्ण झाले. आज तेवढे जेवण जरा अंगावर आले.. घरच्या घरी केलेली शतपावली यावर उतारा म्हणून पुरेशी असते, पण आज चार पावले जरा जास्तच...

गिनिज रेकॉर्ड आणि भारतीय स्त्रिया.

Image
गिनिज रेकॉर्ड भारतीय स्त्रियांच्या खिशात (डोनेट केलेल्या काही फोटोंसह). अवल  | 31 January, 2016 - 10:33 ऑगस्ट 2015पासून सुरू असलेले प्रयत्न आज साजरे झाले  गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड साठी जगातील सर्वात मोठे ब्लँकेट भारतीय स्त्रियांनी आज पूर्ण केले. 11148 स्क्वेअर मीटर इतके मोठे ब्लँकेट आज भारतीय स्त्रियांनी विणून पूर्ण केले. आज सकाळी चेन्नई इथे हे रेकॉर्ड गिनिजच्या माननीय सदस्यांनी जाहीर केले  मला खूप आनंद होतो सांगायला की मी, माझी आई, माझ्या बहिणी, मैत्रिणी, येथील निर्मला, संपदा आणि हजारो भारतीय महिलांनी या उपक्रमात मनापासून सहभाग घेतला होता. ऑगस्ट पासून जानेवारी पर्यंत हा उपक्रम चालू होता. मनात आणलं तर महिला काय करू शकतात याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. चेन्नईच्या सुबश्री नटराजन यांचे समर्थ नेतृत्वाखाली आणि अत्यंत कुशल प्रशासनाखाली अनेक अनोळखी महिला एका झेंड्या खाली एकत्र आल्या; मदर्स इंडिया क्रोशे क्विन्स! फेसबुक, व्हॉट्स अप अशा माध्यमांतून आणि प्रत्यक्ष गाठीभेटीतून हा समान धागा गुंफला गेला, आणि त्यातून विणले गेले हे जगातील सर्वात मोठे, महाप्रचंड ब्लँकेट! सुरूवातीला केवळ 50...