डेरापाडा येथे ABP सोशल ऑर्गनायजेशनमार्फत दिवाळी फराळाचे वाटप
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डेरापाडा. केंद्र - कुंभाळे , तालुका - पेठ येथे "अरुण बाबुराव पवार सोशल ऑर्गनायझेशन , नाशिक " यांच्यामार्फत डेरापाडा गावातील 24 विद्यार्थी तसेच गावांमधील 65 कुटुंबातील साधारणतः 300 च्या जवळपास नागरिक यांना दिवाळीपूर्वी सुग्रास फराळाचे वाटप करण्यात आले. पेठ तालुक्यामधील डेरापाडा हे आदिवासीबहुलवस्तीचे अतिशय दुर्गम असे गाव आहे .ज्या गावांमध्ये पोहोचणेच अत्यंत जीकीरीचे आहे अशा गावांमध्ये म्हणावी तितकी सुधारणा व विकास आजही झालेला दिसून येत नाही. पाण्याचे कायमचे दुर्भिक्ष असलेल्या या गावाला आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच उपजीविकेचे साधन नसल्यामुळे येथील बहुतांशी नागरिक वर्षभरातील सात ते आठ महिने जिल्ह्यात बाहेरच स्थलांतरित होऊन कामासाठी वणवण फिरत राहतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत कमी असल्यामुळे ,कमी वार्षिक उत्पन्न असल्यामुळे सण - उत्सव हव्या त्या उत्साहाने साजरी करता येणे शक्यच नसते .नेमकी हीच बाब हेरुन "अरुण बाबुराव पवार सोशल ऑर्...