Posts

Showing posts from December, 2019

पांडा - ढेबा - टिंगा - कोंबडी

Image
                    .....पांडा - ढेबा - टिंगा - कोंबडी.....                         हे आहेत आमचे पांडा, ढेबा ,टिंगा व कोंबडी ! ऐकून कोणालाही नवल वाटणे साहजिकच आहे.पण हि आमच्या दाखलपात्र वयोगटातील मुलांची- मुलींची नावे आहेत. सुरुवातीला यांची नावे ऐकून मी सुद्धा चक्रावून गेलो होतो.परंतु ही मुले इतकी गोंडस दिसतात की यांची ही नावे गावातीलच इतर लोकांनी लाडाने ठेवलेली आहेत.त्यांची मूळ नावेसुद्धा तितकीच सुंदर आहेत,जितकी यांची घरी लाडाने ठेवलेली नावे !                 यांचा दिवसभराचा रुटीन सुरू होतो तो शाळेची घंटा वाजल्यानंतर .शाळेच्या परिपाठावेळी आम्ही शाळेची घंटा दिली की हे चौघे गावांमध्ये असतील तिथून असतील तशा अवस्थेतून शाळेकडे धावत येतात. मग साहजिकच ती त्यावेळी अंगणवाडीमध्ये असतात.अंगणवाडी मदतनीस त्यावेळी त्यांना सोडायला तयार नसतात, परंतु त्यांना शाळेमध्ये इतक्या आतुरतेने यावे वाटते की ते अंगणवाडी मधून लगेच पळ काढतात व शाळेतील वर्गामध्...

केंद्र कुंभाळे अध्यक्ष चषक स्पर्धा

Image
अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा, केंद्र - कुंभाळे .                    असं म्हणतात की ,कुठलीही निकोप स्पर्धा ही विद्यार्थ्याला भविष्यासाठी तयार करत असते. विद्यार्थिदशेत स्पर्धात्मक आयुष्य जगलेला विद्यार्थी भविष्यात कुठल्याही पातळीवर स्वतःला अगदी सहजपणे सिद्ध करू शकतो. कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला एक वेगळ्या प्रकारचं वळण देण्यास कारणीभूत नक्कीच ठरत असतात. ज्या प्रकारे एखादा कारागीर त्याच्या अणकुचीदार शस्त्रांनी दगडांमधील अनावश्यक भाग दूर करून त्यातून सुंदर अशी रेखीव मूर्ती घडवीत असतो, त्याच प्रकारे या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या अंतर्गुणांना वाव देण्याचे कार्य अगदी चपखलपणे करत असतात.                                याच धर्तीवर कुंभाळे केंद्रामध्ये जिल्हा परिषद नाशिक आयोजित अध्यक्ष चषक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा केंद्रस्तरीय पातळीवर जिल्हा परिषद शाळा ,राजबारी येथे अगदी उत्साहीपणे व आनंदाच्या वातावरणामध्ये पार पाडण्यात आल्या ...

रक्तदान शिबीर , पेठ

Image
रक्तदान शिबीर , शिक्षण विभाग , मु.पो.ता.पेठ , जि.नाशि क.  रक्तदान  हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून  रक्त  काढून देण्याची क्रिया आहे. असे रक्त रोग्याच्या शरीरात चढवण्यापूर्वी कधीकधी बायोफार्मास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते, व संपूर्ण रक्त (Whole Blood) किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक रोग्याच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. अनेकदा रक्त संकलन प्रक्रियेत रक्त बँकांचा सहभाग असतो.बहुतेक रक्तदाते (स्वयंसेवक) स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात. काही देशांमध्ये, रक्ताचा पुरवठा मर्यादित आहे, कारण देणगीदार फक्त नातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठीच रक्तदान करतात. अनेक रक्तदाते रक्तदान एक देणगी म्हणून करतात. परंतु ज्या देशांमध्ये रक्त विकण्याची परवानगी आहे तिथे रक्तदात्यांना पैसे मिळतात. रक्तदानासाठी काही ठिकाणी कामकाजावरून मोकळा वेळ दिला जातो. अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतिपश्चात रक्तस्राव, शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता ...