अजिंक्य किल्ले रामशेज
तसा रामशेज किल्ला माझ्या खूप आवडीचा, माझ्या घरापासून खूप जवळचा व वेळोवेळी खुणावणारा असाच किल्ला. माझ्या शाळेला जातानाच्या मार्गावर या किल्ल्यालाच वळसा घालून मला नेहमी जावे लागते. किल्ल्यावर ट्रेक खूप वेळा केले परंतु एक हा किल्ला जसा काही वेळोवेळी खुणावतच राहतो. मराठ्यांनी तब्बल साडेसहा वर्ष मुघलांपासून हा किल्ला अजिंक्य असाच ठेवला.यामुळेच की काय, या किल्ल्यावर गेल्यानंतर इतर ट्रेकपेक्षा एक वेगळीच ऊर्जा व प्रेरणा मिळत राहते. दिवाळी सुट्टीच्या काळात तब्बल 15 दिवस ट्रेकिंगला,व्यायामाला खंड पडलेलाच होता. त्यामुळे दिवाळी सुट्टी संपताच ट्रेकला सुरुवात केली ती पुन्हा एकदा रामशेज किल्ल्यावरील ट्रेकनेच. रामशेज हा किल्ला नाशिक शहरापासून खूप जवळ आहे.नाशिक मध्यवस्तीपासून साधारणपणे 12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे तर माझ्या घरापासून जवळपास सहा ते सात किलोमीटर एवढ्या अंतरावर हा किल्ला आहे.मधल्या बाजूतील दोन ते तीन किलोमीटर पर्यंतचा रस्ता बांधकाम चालू असल्यामुळे खराब आहे व धुळीचा आहे, परंतु किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रस्ता ...