Posts

Showing posts from December, 2024

चार युगांचा साक्षीदार-हरिश्चंद्रगड

Image
                  महाराष्ट्रामधील क्वचितच एखादी व्यक्ती अशी असेल की ज्याने हरिश्चंद्रगड -कोकणकडा याचं नाव देखील ऐकलेलं नसेल किंवा समाज माध्यमातून त्याचे फोटो,व्हिडिओ पाहिलेले नसतील,इतका हरिश्चंद्रगड व त्यावरील कोकणकडा ,महादेव मंदिर सुप्रसिद्ध आहे.तसं बघायला गेलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा त्या परिसरामधील गड- किल्ल्यांसाठी,विविध भव्य- दिव्य डोंगररांगांसाठी सुप्रसिद्ध आहे.या रांगेमध्ये खूपच  भव्य -उंच -विशाल,ट्रेकर मंडळींना खुणावणारे गड किल्ले व सुळके आढळतात.पावसाळ्यात व हिवाळ्यामध्ये तर यांचे सौंदर्य अधिकच बहरलेले बघायला मिळते. अलंग -मदन- कुलंग- रतनगड-भैरवगड, आजोबा किल्ला याशिवाय विविध उंच सुळके,धबधबे यांनी हा प्रांत बहरलेला आहे.या भागातील विपुल पर्जन्यमान, वृक्षराजी, दाट जंगल व येथील निवासी ग्रामस्थांनी राखलेले जंगल यामुळे या भागाचे गावपण व नैसर्गिक स्थिती आजही शाबूत आहे,त्यामुळे विविध प्रकारचे प्राणी,पक्षी व जैवविविधता, निसर्गाची विविध रूपे,मुक्त रंगाने निसर्गाची उधळण बघायची असेल तर एकदा या भागामध्ये येऊन मुक्...