किल्ले अहिवंत चा राखणदार- किल्ले मोहनदर ऊर्फ शिडका किल्ला
जिवनमें यह अमर कहानी, अक्षर अक्षर गढ लेना... और शौर्य कभी सो जाए तो- मराठा साम्राज्य पढ लेना | छ्त्रपती शिवरायांच्या युद्धनीती, कूटनीतीबद्दल बोलावे तितके कमीच आहे.शिवरायांच्या गड किल्ल्याच्या निर्मितीबाबत तसेच या प्रत्येक गडावरील इंजीनियरिंगबाबत बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी माहित आहेत व या माहीत असलेल्या गोष्टी आपणा सर्वांना अचंभित करणाऱ्याच आहेत.जसे की,"सर्वात उंच गडमाथ्यावर विपुल प्रमाणात पाण्याची सोय करणे,गुप्त वाटांची जागा हेरून ठेवणे शत्रूला चकवा देण्यासाठी तोशीस करून ठेवणे,इ".केवळ आणि केवळ याच कारणामुळे शिवराय स्वराज्य निर्मिती करू शकले व स्वराज्य टिकवून देखील ठेवू शकले.त्यामुळेच ते प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनले.आज देखील छत्रपती शिवराय आपल्या सर्वांसाठी यामुळेच प्र...