Posts

Showing posts from 2022

साहसी भैरवगडाची सफर

Image
   बऱ्याच दिवसापासून भैरवगड या किल्ल्याबद्दल ऐकून होतो.भैरवगडला लागून असलेला घनचक्कर या महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचा उंच शिखर याबद्दलही ऐकून होतो.याच्या नावाची सुद्धा ऐकून गंमत वाटत होती त्यामुळेच घनचक्कर व भैरवगड हे दोन्ही किल्ले यांचा ट्रेक करणे खूपच दिवसापासून मनात रेंगाळत होते.तसा सहसा आमचा ट्रेक रविवार सुट्टीचा वार बघूनच निघायचा.परंतु यावेळी या प्रथेला फाटा देत आम्ही ऐनवेळेला शनिवारी ट्रेक करायचे ठरवले.ट्रेक करण्यासाठीची आमची हौशी मंडळी किशोर,मी व सचिन भाऊ लगेचच तयार होऊन तिघेच निघायचे ठरले.      नगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी जसं काही माहेरघरच म्हणावे लागेल कारण हरिश्चंद्रगड,तारामती,कळसुबाई, संधान व्हॅली,अलंग- मदन- कुलंग ही साखळी तसेच रतनगड,पाबरगड  या व्यतिरिक्तही माहीत नसलेले अनेक किल्ले व शिखरे या साखळी मधील महत्त्वाचे पॉईंट्स होत. महाराष्ट्रात एकुण ६ भैरवगड आहेत. त्यापैकी २ भैरवगड हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत आहेत. हरिश्चंद्रगडावर टोलारखिंडी मार्गे येणार्‍या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोथळ्याचा भैरवगड आहे . तर राजुर मार्गे...

अजिंक्य किल्ले रामशेज

Image
                    तसा रामशेज किल्ला माझ्या खूप आवडीचा, माझ्या घरापासून खूप जवळचा व वेळोवेळी खुणावणारा असाच किल्ला. माझ्या शाळेला जातानाच्या मार्गावर या किल्ल्यालाच वळसा घालून मला नेहमी जावे लागते. किल्ल्यावर ट्रेक खूप वेळा केले परंतु एक हा किल्ला जसा काही वेळोवेळी खुणावतच राहतो. मराठ्यांनी तब्बल साडेसहा वर्ष मुघलांपासून हा किल्ला अजिंक्य असाच ठेवला.यामुळेच की काय, या किल्ल्यावर गेल्यानंतर इतर ट्रेकपेक्षा एक वेगळीच ऊर्जा व प्रेरणा मिळत राहते. दिवाळी सुट्टीच्या काळात तब्बल 15 दिवस ट्रेकिंगला,व्यायामाला खंड पडलेलाच होता. त्यामुळे दिवाळी सुट्टी संपताच ट्रेकला सुरुवात केली ती पुन्हा एकदा रामशेज किल्ल्यावरील ट्रेकनेच.  रामशेज हा किल्ला नाशिक शहरापासून खूप जवळ आहे.नाशिक मध्यवस्तीपासून साधारणपणे  12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे तर माझ्या घरापासून जवळपास सहा ते सात किलोमीटर एवढ्या अंतरावर हा किल्ला आहे.मधल्या बाजूतील दोन ते तीन किलोमीटर पर्यंतचा रस्ता बांधकाम चालू असल्यामुळे खराब आहे व धुळीचा आहे, परंतु किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रस्ता ...