Posts

Showing posts from August, 2023

मोबाईल स्क्रीन कास्टिंग कशी कराल ?

Image
  स्क्रिन कास्टिंग करून मोबाईल मिरर करणे          शाळेमध्ये जर प्रोजेक्टर असेल आणि जर प्रोजेक्टर ने तुम्हाला मोबाईल स्क्रीन कास्टिंग करून मोठ्या पडद्यावर दाखवायचा असेल तर त्यासाठी क्रोम कास्ट किंवा मीरा कास्ट किंवा एनी कास्ट या नावाचे एक छोटे डिवाइस मिळते , त्याची किंमत हजार ते बाराशे पर्यंत असते, ऑनलाइन घेतलं तर 800 रुपयापासून पुढे ते मिळतात .           प्रोजेक्टरच्या एचडीएमआय पोर्टला हे क्रोम कास्ट किंवा एनिकास्ट किंवा मीरा कास्ट लावायचे व चार्जरच्या चार्जिंग सॉकेटला त्याची पावर केबल लावून बटन चालू करून घ्यायचे व प्रोजेक्टर देखील चालू करायचा . दोन्ही चालू केल्यानंतर प्रोजेक्टरच्या मोठ्या पडद्यावर मीरा कास्ट किंवा क्रोमकास्ट किंवा एनी कास्टचं पेज दिसतं. आता ज्या मोबाईल ने तुम्ही  स्क्रीन मिरर करणार असाल , त्या मोबाईलचे पहिल्यांदा वाय-फाय ऑन करून घ्यावे. त्यानंतर मोबाईल मधील स्क्रीन कास्टिंग किंवा स्क्रीन मिररिंग हा ऑप्शन चालू करावा. चालू केल्यानंतर तेथे तुम्हाला तुमच्या क्रोम कास्ट किंवा मिर...