Posts

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

Image
                               शिवरायांचे गड - किल्ले,शिवकालीन इतिहास याबाबत यापूर्वी एक प्रकारची मूर्छित अवस्था मधल्या काळात आलेली आपणास बघायला मिळत होती. परंतु आताच्या काळात एक आशादायक चित्र आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहते आहे. विशेषतः तरुण पिढीच्या मनात सोशल मीडिया इन्फ्लुएन्समुळे का होईना परंतु गड-किल्ल्यांवर भटकायची क्रेझ तयार झाली आहे. वीकेंडला तसेच जोडून सुट्ट्या आल्यानंतर गड -किल्ल्यांवर मुक्कामी जाण्याचे,खास टेन्टमध्ये मुक्काम करण्याचे तसेच ग्रामीण भागातील आयुष्य जगण्याचे अनुभव घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे.यातील काही उणीवा निश्चितच असतील,मात्र यामुळे निश्चितच काही अंशी का होईना,मी तर म्हणेन बऱ्याच अंशी शिवराय जनमानसाला कळत आहेत. जागोजागी याबाबत सांघिक उठाव होताना आपल्याला दिसून येतात जसे की,शिवकालीन अभ्यास शिबिरे, शस्त्र प्रदर्शन, मोडी लिपी अभ्यास वर्ग, व्याख्यानमाला, परिसंवाद,गड भ्रमंती,विविध मोहिमा, इ.                   याच प्रयत्नांमध्ये एकसूत्र...

मराठ्यांचे शस्त्रागार,रक्तरंजित इतिहासाचा साक्षीदार-किल्ले कोथळीगड. शिवजयंती विशेष ट्रेक.

Image
                     दिनांक १९ फेब्रुवारी हा दिवस माहित नसेल असा एकही महाराष्ट्रीयन शोधून सापडणार नाही. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात,धुमधडाक्यात प्रत्येक घराघरात जल्लोषाने ढोल-ताशांच्या गजरात साजरी करण्यात येते.गड-किल्ले सजवून,भगव्या पताका लावून,शस्त्रांच्या धाडसी खेळांचे आयोजन करून,शिवप्रतिमा तसेच छत्रपती शिवरायांच्या मुर्त्यांना अभिषेक व पुष्पहार अर्पण करून याशिवाय विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून देखील शिवजयंती साजरी करण्यात येते.शिवजयंती दिवशी आमच्या जल्लोष च्या टीमनेदेखील दुरून शिवरायांच्या जिरेटोपाप्रमाणे दिसणारा ,तळ कोकणावर वर्चस्व स्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका असलेला,जिल्हा रायगड, तालुका कर्जत येथील " किल्ले कोथळीगड " येथील ट्रेक करून,तत्कालीन इतिहासाला उजाळा देऊन शिवजयंती आगळ्यावेगळ्या मार्गाने साजरी करण्याचे ठरविले. 🚩 किल्ले कोथळीगडचा इतिहास :-       -------------------------------------                     ...