श्री काशिनाथ कदम यांच्यातर्फे डेरापाडा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,डेरापाडा,तालुका -पेठ येथे मा.श्री काशिनाथ कदम यांच्यातर्फे शाळेमधील 23 विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या स्कूल बॅगचे आज वाटप करण्यात आले. स्वतः अत्यंत खडतर परिस्थितीतून परिश्रम करून,गोरगरिबीच्या अनंत यातना व झळा सोसून त्यातून तावून-सुलाखून वर आलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे श्री काशिनाथ कदम मामा. काशिनाथ कदम मामांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक सुरेख पैलू म्हणजे अडचणीत आलेल्यांना, गोरगरिबांना निस्वार्थ भावनेने मदत करण्यात यांचा पुढाकार असतो. कोरोना काळामध्ये नाशिकमध्ये यांनी अन्नदानाचे खूप महत्त्वाचे कार्य केले होते. डेरापाडा हे गाव प्रामुख्याने शेती व शेतमजुरी करणाऱ्या तसेच स्थलांतराचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या गावांपैकी एक आहे. वर्षभर गावामध्ये केवळ महिला व वृद्ध व्यक्तीच दिसून येतात .कारण सर्व तरुण ,स्त्री-पुरुष तसेच वयात आलेली सर्व मुले सह्याद्री ,त्र्यंबकेश्वर येथे कामासाठी जातात व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये द्राक्षबागांवरती काम करून पैसे कमवण्यासाठी विखुरलेले असतात. त्य...