Posts

Showing posts from July, 2023

डेरापाडा शाळेत छत्री वाटप

Image
  उपनगर क्रियाशिल फ्रेंड सर्कलमार्फत २५ छत्री वाटप                  सामाजिक दातृत्वाची भावना ठेवत आपण ज्या समाजातून जन्मलो ,वाढलो, विकसित झालो, त्या समाजाला हात धरून पुढे नेण्याची जबाबदारी मनामध्ये ठेवून कार्य करणारे व्यक्ती समाजामध्ये फार कमी असतात आणि खऱ्या अर्थाने अशा व्यक्तींमुळेच समाज पुढे जाताना देखील दिसून येतो . देशाच्या प्रगतीचे ,विकासाचे मुख्य आधारस्तंभ अशाच व्यक्ती असतात .ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेनेच उपनगर येथील सरकारी कर्मचारी, व्यावसायिक व इतर उत्साही व्यक्तींचा मिळून *उपनगर क्रियाशील फ्रेंड्स सर्कल* या ग्रुप तर्फे डेरापाडा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आज छत्र्या वाटप करण्यात आल्या.                  शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी पावसाळ्यात भिजू नये यासाठीच हा स्तुत्य उपक्रम उपनगर क्रियाशील फ्रेंड यांच्या वतीने राबविण्यात आला.याप्रसंगी कुंभाळे गावचे सामाजिक कार्यात सदैव तत्पर असलेले आमचे मार्गदर्शक श्री मधुकर आवारी सर,आर्वी फार्माचे संचालक श्...

मार्कंडेय ऋषी पर्वत ट्रेक

Image
                      मार्कंडेय पर्वत                      वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेला , निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेला, ट्रेकर मंडळीचा खरा कस पाहणारा हा किल्ला म्हणजेच मार्कंडेय किल्ला .सप्तशृंगी वणी येथून समोरच दिसणारा हा मार्कंडेय किल्ला सप्तशृंगी वनी मधून पाहताना अत्यंत कठीण व चढण्यासाठी अतिशय दुर्गम असाच वाटतो. परंतु वनी पासून कळवण जाणाऱ्या मार्गावरून आपण वन विभागाने बांधलेल्या सिमेंट काँक्रीटच्या पायऱ्यांपासून आपण गडाच्या अर्ध्या भागापर्यंत सहजतेने पोहोचू शकतो. मधल्या भागामध्ये लोखंडी उंच जिने देखील वनविभागाने बांधलेले दिसून येतात. दोन्ही बाजूला उंच उंच पर्वत व खाली खोल दरी बघायला मिळते . तेथून पुढे मार्कंडेय ऋषींच्या मंदिरापर्यंत जाईपर्यंत दोन्ही बाजूला लोखंडी मजबूत रेलिंग असल्यामुळे त्याला धरून वरती चढणे सोपे ठरते, परंतु चढ उभा असल्यामुळे चढणे थोडेसे कठीणच असते .त्यातच बारीक पाऊस असेल तर जास्तच मऊ चिखल होऊन पाय दगडांवरून घसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे उत्तम दर्जाच...

डेरापाडा येथे देवा ग्रुपतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

Image
शैक्षणिक स्टेशनरी उपयुक्त साहित्य वाटप कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डेरापाडा येथे संपन्न                        आज दिनांक- 12 जुलै 2023 ,वार- बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डेरापाडा येथे देवा ग्रुप फाउंडेशन चे तालुका अध्यक्ष व सदस्य यांच्यामार्फत जिल्हा परिषद शाळा ,डेरापाडा येथील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम समाज मंदिरामध्ये पार पडला.माझ्या माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेत देवा फाउंडेशन, तालुका पेठ येथील सदस्यांना डेरापाडा येथे पाचारण करत त्यांच्या हस्ते साहित्य वितरणाचा कार्यक्रम आनंदामध्ये पार पडला.                   या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सदस्यांनी स्व-खर्चाने विद्यार्थ्यांसाठी दिलेली ही शैक्षणिक भेट या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाचा क्षण होता. आपण ज्या शाळांमधून शिक्षण घेतो आहोत त्या शाळांच्या प्रति उपकृत होण्याच्या भावनेतूनच सदस्यांनी या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन उत्स्फूर्तपणे केलेले ...

डेरापाडा शाळेत शुजचे वाटप

Image
          जि.प.शाळा,डेरापाडा येथे विद्यार्थ्यांना शुज वाटप                          आज दिनांक ७ जुलै २०२३,वार - शुक्रवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डेरापाडा ,केंद्र-कुंभाळे, तालुका - पेठ ,जिल्हा नाशिक येथे नाशिकमधील सुप्रसिद्ध बांधकाम साहित्य व्यावसायिक माननीय कैलासजी तांदळे साहेब यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डेरापाडा,ता:- पेठ येथील सर्व २४ विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचे दर्जेदार शूजचे वाटप करण्यात आले.                अतिदुर्गम भागामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रती माननीय कैलासजी तांदळे साहेब यांना नेहमीच आत्मियता,सहानुभूती राहिलेली आहे. त्यांच्या मते "आदिवासींचा विकास करावयाचा असेल, तर शिक्षणाच्या मूलभूत सोयी सुधारल्या पाहिजेत".या हेतुनेच मागील वर्षीसुद्धा माननीय तांदळे साहेबांनी माझ्या जिल्हा परिषद शाळा, डेरापाडा येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक स्टेशनरी साहित्याचे वाटप केलेले होते . बांधकाम साहित्य हा त्यांचा व्यवस...