आदिवासी बांधवांची अक्षय तृतीया
अक्षय तृतीया या सणाला हिंदू धर्मामध्ये अत्यंत असाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया या तिथीला खूप महत्त्वाचे मानले जाते . अक्षय तृतीया या तिथीला एवढे महात्म्य प्राप्त होण्याचे कारण देखील तसेच आहे ,कारण असे सांगितले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगा नदी इंद्रलोकांमधून पृथ्वीवरती अवतरली होती .याच दिवशी परशुराम यांचा जन्म झाला होता. त्रेता युगाची सुरुवात याच दिवशी झाली होती असे सांगितले जाते .याच दिवशी व्यासांनी श्री गणेशा कडून महाभारत लिहून घेण्यास सुरुवात केलेली होती. याच दिवशी महाभारताचे युद्ध देखील संपलेले होते तसेच दुर्गामातेकडून महिषासुराचा वध याच दिवशी झाला होता .पांडवांना सूर्यदेवाकडून अक्षय पात्र याच दिवशी प्राप्त झालेले होते. याच दिवशी श्रीकृष्णाने परममित्र सुदाम्याचे पोहे देखील खाल्ले होते. याच दिवसापासून कुबेराला इंद्राचा खजाना देखील दिला गेला होता. आजच्याच दिवशी वृंदावन मधील श्रीकृष्ण भगवान ...