Posts

Showing posts from 2023

महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट " कळसुबाई शिखर "

Image
                     हिवाळ्याचा ऋतू ,बोचणारी सुंदर गुलाबी थंडी, सगळीकडे हिरवळ दाटलेली, आल्हाददायक ऊन, उंच उंच शिखरावर चालणारा ऊन-सावलीचा विलोभनीय खेळ... एकंदरीतच आमच्यासारख्या ट्रेकर्सना ट्रेकिंग करण्यासाठी, वेगवेगळे गड ,किल्ले, पायवाटा धुंडाळण्यासाठी अगदी विहंगम असाच ऋतू... अशा ऋतूमध्ये पाय एखाद्या उंच शिखराकडे न वळते तरच नवल !  त्यातच आमच्या चामरलेणी ट्रेकर्स  ग्रुपच्या ट्रेकर्सचा उत्साह तर अगदी वाखाणण्याजोगाच !  मग काय ! एका फोनवर सगळे मंडळ हजार !  व लागलीच नियोजन करून आम्ही निघालो "कळसुबाई " या शिखराकडे...!                 अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये बारी गावाजवळ असलेले कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. यालाच "महाराष्ट्राचे माउंट एवरेस्ट"असे देखील म्हणतात. नाशिक पासून साधारणपणे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या या शिखराला हौशी ट्रेकर, निसर्गप्रेमी मंडळी वारंवार भेट देतात. तसे पाहिले तर आरोग्यदायी वातावरण नाशिक मध्ये खूप आहे .त्यातच...

डेरापाडा येथे ABP सोशल ऑर्गनायजेशनमार्फत दिवाळी फराळाचे वाटप

Image
               जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डेरापाडा. केंद्र - कुंभाळे , तालुका - पेठ येथे "अरुण बाबुराव पवार सोशल ऑर्गनायझेशन , नाशिक " यांच्यामार्फत डेरापाडा गावातील 24 विद्यार्थी तसेच गावांमधील 65 कुटुंबातील साधारणतः 300 च्या जवळपास नागरिक यांना दिवाळीपूर्वी सुग्रास फराळाचे वाटप करण्यात आले.           पेठ तालुक्यामधील डेरापाडा हे आदिवासीबहुलवस्तीचे अतिशय दुर्गम असे गाव आहे .ज्या गावांमध्ये पोहोचणेच अत्यंत जीकीरीचे आहे अशा गावांमध्ये  म्हणावी तितकी सुधारणा व विकास आजही झालेला दिसून येत नाही. पाण्याचे कायमचे दुर्भिक्ष असलेल्या या गावाला आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच उपजीविकेचे साधन नसल्यामुळे येथील बहुतांशी नागरिक वर्षभरातील सात ते आठ महिने जिल्ह्यात बाहेरच स्थलांतरित होऊन कामासाठी वणवण फिरत राहतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत कमी असल्यामुळे ,कमी वार्षिक उत्पन्न असल्यामुळे सण - उत्सव हव्या त्या उत्साहाने साजरी करता येणे शक्यच नसते .नेमकी हीच बाब हेरुन "अरुण बाबुराव पवार सोशल ऑर्...

श्री काशिनाथ कदम यांच्यातर्फे डेरापाडा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

Image
  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,डेरापाडा,तालुका -पेठ येथे मा.श्री काशिनाथ कदम यांच्यातर्फे शाळेमधील 23 विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या स्कूल बॅगचे आज वाटप करण्यात आले.            स्वतः अत्यंत खडतर परिस्थितीतून परिश्रम करून,गोरगरिबीच्या अनंत यातना व झळा सोसून त्यातून तावून-सुलाखून वर आलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे श्री काशिनाथ कदम मामा.  काशिनाथ कदम मामांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक सुरेख पैलू म्हणजे अडचणीत आलेल्यांना, गोरगरिबांना निस्वार्थ भावनेने मदत करण्यात यांचा पुढाकार असतो. कोरोना काळामध्ये नाशिकमध्ये यांनी अन्नदानाचे खूप महत्त्वाचे कार्य केले होते.           डेरापाडा हे गाव प्रामुख्याने शेती व शेतमजुरी करणाऱ्या तसेच स्थलांतराचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या गावांपैकी एक आहे. वर्षभर गावामध्ये केवळ महिला व वृद्ध व्यक्तीच दिसून येतात .कारण सर्व तरुण ,स्त्री-पुरुष तसेच वयात आलेली सर्व मुले सह्याद्री ,त्र्यंबकेश्वर येथे कामासाठी जातात व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये द्राक्षबागांवरती काम करून पैसे कमवण्यासाठी विखुरलेले असतात. त्य...