Posts

Showing posts from September, 2022

देवभूमी उत्तराखंड श्री केदारनाथ यात्रा

Image
   देवभूमी उत्तराखंड श्री केदारनाथ मंदिर   उत्तराखंड- देवभूमी...  व या देवभूमीमधीलच एक रत्न ते म्हणजे केदारनाथ.पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे काय हे जर अनुभवायचं असेल तर एकदा प्रत्येकाने उत्तराखंड यात्रा करायलाच हवी.शहाजीबापू पाटील म्हणतात ना... काय झाडी! काय डोंगर ! एकदम ओके! अशाच प्रकारचा काहीसा अनुभव उत्तराखंडला गेल्यावर येतो.जिवंतपणी जर स्वर्ग "याची देही याची डोळा" अनुभवायचा असेल तर एकदा नक्कीच उत्तराखंड,केदारनाथ ही यात्रा करायला हवी. "केदारनाथ" या नावाचा अर्थ "क्षेत्राचा स्वामी" आहे. केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगा...