Posts

Showing posts from June, 2024

सांदन दरी ट्रेक(संधान व्हॕली)

Image
  चामरलेणी ट्रेकर्स                       आडवाटेवरचे,आडवळणाचे ट्रेक कोणाला आवडत नाहीत ! आणि त्यातल्या त्यात अशा ट्रेक्सना ज्यांना काही ऐतिहासिक-भौगोलिक पार्श्वभूमी असेल तर अशा ठिकाणी ट्रेक करण्याची मजाच काही और असते.त्यातल्या त्यात खुल्या मैदानात तंबूमध्ये रातकिड्यांचा आवाज ऐकत, वाऱ्याची सळसळ,थंडगार वाऱ्याचा शहारा अनुभवत,वरतून काजव्यांची टिमटिम पहात जर रात्रीचा मुक्काम करून नंतर ट्रेक असे नियोजन असेल तर ते म्हणजे सोने पे सुहागा !                        तुम्ही कोणत्याही मोसमामध्ये सह्याद्रीमध्ये ट्रेकला जा,सह्याद्री कधीच तुम्हाला निराश करत नाही.सह्याद्री मधील काही ट्रेक तर डोळे विस्फारायला लावतील,अगदी तोंडात बोटे घालायला लावतील असेच आहेत.सह्याद्रीच्या या अखंड-अफाट रांगेपुढे आपण किती क्षुल्लक आहोत याची जाणीव तेथे ट्रेकला गेल्यानंतरच आपल्याला कळते.यातील काही ट्रेक आपण पहाटे लवकर जाऊन दुपार-सायंकाळपर्यंत संपवू शकतो असे आहेत.तर काही ट्रेक आवर्जून तेथे रात्री मुक्क...