विषयमित्र, जि.प.शाळा,डेरापाडा.
आमचा विषयमित्र उपक्रम:जि.प.शाळा , डेरापाडा आमच्या उपक्रमांसंदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. हे नेहमीच सिद्ध झाले आहे की ,कोणतीही व्यक्ती आपल्या समवयस्क व्यक्तींमार्फत अधिक लवकर पुढील क्रिया व गोष्टी व कुठल्याही प्रकारचे नवीन ज्ञान लवकर आत्मसात करत असते. नवनवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी आसुसलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तर ही गोष्ट अगदी तंतोतंत लागू पडते. बाल मानस शास्त्र असे सांगते की विद्यार्थी शिक्षकांपेक्षा किंबहुना शिक्षकांनी शिकवलेल्या ज्ञानापेक्षा त्यांच्या वयोगटातील इतर मुलां मार्फत अधिक लवकर कुठल्याही प्रकारचे ज्ञान आत्मसात करून घेतात. असे म्हटले जाते की शिक्षकाने शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांशी मुलाच्या आईप्रमाणे वागले पाहिजे. यापुढे जाऊन मी तर असे म्हणेन की शिक्षकाने शाळेमध्ये अध्यापन करताना विद्यार्थ्यांशी विद्यार्थीच होऊन वागायला हवे ,त्याच्या वयोगटाशी अनुरूप होऊनच समरस व्हायला हवे. बाल मानसशास्त्र तसेच अभ्यासक्रम निर्मिती करणाऱ्या विविध संस्था ,संघटना तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध व्यक्तींनी हि गोष्ट निर्विवादपणे मान्य ...