८० अंश कोनातील पायऱ्या, थरारक किल्ले हरिहर
हरिहर किल्ल्याचे नाव ऐकलं नसेल,त्याबद्दल माहिती ऐकली नसेल,त्याचे थरारक व्हिडिओ युट्युब किंवा इतर सोशल मीडियावर पाहिले नसतील असा महाराष्ट्रात क्वचितच एखादा व्यक्ती आढळेल इतका हरिहर किल्ला त्याच्या थरारकतेसाठी,ट्रेकर्सना ऍडव्हेंचरसाठी प्रसिद्ध आहे.ट्रेकिंग करणाऱ्या व न करणाऱ्या सहसा प्रत्येकाला हरिहर किल्ल्याचे किमान नाव तरी ऐकून आहे.हरिहर किल्ल्याला इतकी प्रसिद्धी मिळण्यास कारण म्हणजेच त्याच्या ८०° कोनातील कातळ कोरीव उभ्या उंचीच्या पायऱ्या.या पायऱ्यांची,या किल्ल्याची मोहिनी प्रत्यक्ष इंग्रजांना देखील पडलेली होती त्यामुळेच त्यांनी या किल्ल्याच्या पायऱ्या उध्वस्त न करता आहे तसे याचे सौंदर्य अबाधित राहू दिले. अन्यथा महाराष्ट्रामधील बऱ्याचशा किल्ल्यांची नासधूस इंग्रजांनी करून त्याच्या पायऱ्या पूर्णपणे उध्वस्त केल्या आहेत जेणेकरून तिथे कोणी पोहोचू शकू नये.नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर तालुक्यापासून जवळ असलेला,साधारणपणे नाशिक पासून तास- सव्वा तासाच्या अंतरावर असलेला हा किल्ला अगदी प्रत्येकालाच आ...