छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई
सातमाळाचे रत्न असलेल्या किल्ले राजदेर येथील ट्रेकवेळीच रेंज ट्रेक असलेल्या व राजदेर समोरीलच इंद्रायणी/ इंद्राई या किल्ल्यावरील ट्रेकचा आमचा प्लॅन ठरलेला होता.श्रावण सुरू असल्यामुळे पावसाची बऱ्यापैकी उघडीप होती,सुंदरसे धुके गड माथ्यावर नेहमी बघायला मिळत होते.एकूणच वातावरण अत्यंत आल्हाददायक होते. मुळात इंद्राई ट्रेकची खूपच धमाल आली,त्याला कारण ही तसेच होते.सर्वात आधी न्हावी गडाच्या ट्रेकचा प्लॅन ठरला...तो काही कारणास्तव कॅन्सल होऊन साल्हेर व सालोटा हा प्लॕन ठरला...तोही काही कारणास्तव रद्द होऊन अंकाई व टंकाई या जोड किल्ल्यांचा ट्रेक करायचे ठरवले... ठरल्याप्रमाणे रविवारी बाहेर पडलो...गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरून पुढे आल्यानंतर चालू गाडीमध्ये अचानक पुन्हा प्लॅन बदलला व आम्ही आमच्या सगळ्या गाड्या इंद्राई किल्ल्याकडे वळवल्या. हा प्लॅनमधील अनपेक्षितपणे झालेला बदल खूपच आनंद देऊन जाणाराच होता.जीवनात असे इंटरेस्टिंग बदल येणे खूपच आवश्यक आहे,त्याशिवाय जगण्याची मजा दे...