डेरापाडा जि.प.शाळेत टॕबचे उदघाटन
रुहानी मिशन संस्था,देवळाली यांच्यामार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डेरापाडा येथील विद्यार्थ्यांसाठी सॅमसंग कंपनीचा दर्जेदार टॅबलेट शाळेसाठी भेट म्हणून दिला ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत 19 हजार रुपये इतकी आहे. यासोबतच संस्थेच्या सदस्यांनी शाळेतील मुलांना 15 प्रकारच्या विविध वस्तूही भेट म्हणून दिल्या.त्यामध्ये उत्तम प्रकारची बांधणी असलेले दप्तरे,3 प्रकारची बिस्किटे,पेन्सिल,खोडरबर,वह्या, स्केचपेन,रंगखडू,कंपासपेटी, चित्रकललेची वही,सर्व विद्यार्थ्यांसाठी चॉकलेट तसेच खाऊ व कुरकुरे दिले. यासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत गावातील सर्व लोकांना कपडे तसेच शालेय मुलांना देखील कपड्यांचे वाटप त्यांनी केले आणि गावातील गोरगरीब व्यक्तींना किरकोळ किराण्याचे वाटप देखील संस्थेमार्फत करण्यात आले. येतानाच संस्थेच्या सदस्यांनी गावातील सर्व लोक,विद्यार्थी या सर्वांसाठी स्वादिष्ट पुलाव देखील बनवून तो गरम पॅक करून आणला होता,...