दूंधा,बिष्टा,कऱ्हा,अजमेरा... दुर्ग भटकंती
दूंधा,बिष्टा,कऱ्हा,अजमेरा... दुर्ग भटकंती दुर्ग भटकंती हा नेहमीच आमच्या जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे.असे खूप सारे गड-किल्ले आहेत जे रेंज ट्रेकने करता येतात. रेंज ट्रेक म्हणजेच एक किल्ला सर करून त्याच ओळीतला त्याच डोंगर रांगेतला दुसरा किल्ला लगेच करणे. रेंज ट्रेक करण्यामध्येसुद्धा एक वेगळीच मजा असते.जोपर्यंत अंगातली झिंग उतरत नाही,पाय थकत नाहीत,जवळचे अन्न व पाणी संपत नाही व सूर्य पूर्णतः मावळत नाही तोपर्यंत होता होईल तितके नजरेच्या टप्प्यामधील गडकिल्ले सर करण्यामध्ये मिळणारा आनंद काही औरच असतो.रेंज ट्रेक करताना ओळीमध्ये येणारे काही किल्ले छोटे तर तुलनेने काही किल्ल्यांची भटकंती खूप असते,रेंज ट्रेक मधील काही किल्ले खूपच सोपे तर काही जीवघेणेदेखील असतात.काही किल्ल्यांचे शिखर चिंचोळे-निमुळते असते तर काही किल्ल्यांचे पठार अवाढव्य असते,जे फिरायलाच तास-दोन तास लागतात.त्यामुळे अशावेळी रेंज ट्रेक केल्याने अधिकाधिक किल्ल्यांची सैर होते. किल्ले बिष्टा :- नाशिकमध...