विषयमित्र, जि.प.शाळा,डेरापाडा.
आमचा विषयमित्र उपक्रम:जि.प.शाळा , डेरापाडाआमच्या उपक्रमांसंदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. |
या उपक्रमाचे गांभीर्य लक्षात घेता शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती उंचावण्यासाठी मी हा उपक्रम माझ्या वर्गामध्ये राबविण्याचा व तो यशस्वी करण्याचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत इयत्ता तिसरी व इयत्ता चौथी मधील असे विद्यार्थी निवडले की जे त्यांच्या वयोगटातील विद्यार्थ्यांपेक्षा हुशार तर आहेतच परंतु जे त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी सक्षमपणे पार पडू शकतात तसेच ज्यांच्या या शैक्षणिक वर्गाच्या क्षमता पूर्ण झालेल्या आहेत. अशा विषय मित्रांवर काही सोपी जबाबदारी निश्चित करून देण्यात आली. उपचारात्मक अध्यापन करण्यासाठी अशा विद्यार्थ्यांना शाळा भरायच्या आधी एक तास व शाळा सुटल्यानंतर एक तास तसेच सुट्टीच्या दिवशी गावातील समाज मंदिरामध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून दिलेले विषय व घटक इतर विद्यार्थ्यांना समजावून देण्याची व त्यांचेकडून सराव करून घेण्याची जबाबदारी देण्यात आली. आपल्यातीलच एक विद्यार्थी, आपलाच सवंगडी आपल्याच बोलीभाषेतून आपल्यालाच शिकविणार ,अध्यापन करणार या संकल्पनेतून सर्वच विद्यार्थी अगदी उत्साहित झालेले आढळून आले. सुरुवातीच्या काळात केवळ भाषा विषय म्हणजेच मराठी ,इंग्रजी त्यासोबतच गणित या विषयांच्या त्या-त्या वर्गांच्या क्षमता पूर्ण करण्याकडे अधिकाधिक भर दिला गेला.
मराठीमधील वाचन या प्रक्रियेनंतर आता आम्ही श्रुतलेखन या प्रक्रियेवर यशस्वीपणे विषयमित्रांच्या माध्यमातून काम केलेले असून आता सद्यस्थितीला इंग्रजी या विषयातील वाचन व संभाषण या क्रियांवरती काम चालू आहे. अगदी कमी कालावधीमध्ये आम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळाले असून आज रोजी विद्यार्थी छान प्रकारे इंग्रजीमधून वाचन तर करू लागलेले आहेतच त्याचसोबत तोडकेमोडके संवाद देखील बोलू लागले आहेत. मला आशा वाटते की विषयमित्र या आमच्या उपक्रमामुळे आमच्या शाळेची गुणवत्ता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.
Comments