रक्तदान शिबीर , पेठ

रक्तदान शिबीर , शिक्षण विभाग , मु.पो.ता.पेठ , जि.नाशिक. 

रक्तदान हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे. असे रक्त रोग्याच्या शरीरात चढवण्यापूर्वी कधीकधी बायोफार्मास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते, व संपूर्ण रक्त (Whole Blood) किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक रोग्याच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. अनेकदा रक्त संकलन प्रक्रियेत रक्त बँकांचा सहभाग असतो.बहुतेक रक्तदाते (स्वयंसेवक) स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात. काही देशांमध्ये, रक्ताचा पुरवठा मर्यादित आहे, कारण देणगीदार फक्त नातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठीच रक्तदान करतात. अनेक रक्तदाते रक्तदान एक देणगी म्हणून करतात. परंतु ज्या देशांमध्ये रक्त विकण्याची परवानगी आहे तिथे रक्तदात्यांना पैसे मिळतात. रक्तदानासाठी काही ठिकाणी कामकाजावरून मोकळा वेळ दिला जातो.

  • अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतिपश्चात रक्तस्राव, शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
  • महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते.
  • मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमधे शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.

ब्लड बँकेच्या रेफ्रिजरेटरमध्ये रक्त ४-५ आठवड्यांपर्यंत रक्त सुरक्षित ठेवता येते.रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते.


  • या देशात १२० कोटी लोकसंख्या असूनही केवळ ७४ लाख ते १ कोटी २० लाख लिटर रक्त संकलित होते.
  • रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे.
  • भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात. 

    रक्तदानाचे फायदेसंपादन करा

    1. रक्ताची तपासणी होते (एच.आय.व्ही., गुप्त रोग, कावीळ-ब, क प्रकारची, मलेरिया) वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते.
    2. रक्तगट व हिमोग्लोबिनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळते.
    3. बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.
    4. नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते.
    5. नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय-यकृतासारखे अवयव निरोगी राहतात.

      रक्तदान कोण करू शकत नाहीतसंपादन करा

      1. रक्तदात्याने आधीच्या ३ दिवसांत कोणतेही प्रतिजैविक औषध घेतले असल्यास.
      2. रक्तदात्याला मागील ३ महिन्यात मलेरिया झाला असल्यास.
      3. रक्तदात्याला मागील १ वर्षात विषमज्वर, कावीळ किंवा श्वानदंश होऊन त्याने रेबीजची लस घेतली असल्यास.
      4. ६ महिन्यापूर्वी त्याची मोठी शस्त्रकिया झाली असल्यास.

        रक्तदाता कार्डसंपादन करा

        • स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला प्रमाणपत्र व कार्ड दिले जाते.
        • ह्या कार्डावर रक्तदात्यास किंवा त्याच्या परिवारापैकी कुणाला रक्ताची गरज असल्यास रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त मोफत दिले जाते.
      5. गर्भवती महिला, महिलेला १ वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा ६ महिन्यात गर्भपात झाला असल्यास.

     रक्तदानाचे हे वैश्विक महत्व लक्षात घेता रक्तदानाबद्दल जनजागृती तसेच रक्तसंकलन करण्यासाठी सर्व शिक्षक संघटना, शिक्षण विभाग पंचायत समिती पेठ जिल्हा नाशिक यांच्या वतीने पंचायत समिती सभागृह ,पेठ येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये बहुतांशी शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेत रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी आदरणीय गटशिक्षणाधिकारी माननीय सरोजजी जगताप मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले. माननीय जगताप मॅडम या शिक्षणक्षेत्रामध्ये नवनवीन संकल्पना राबविण्यात मध्ये नेहमीच आघाडीवर असतात .त्यांच्या एकंदरीत सहकार्यामुळे सर्वच शिक्षकांमध्ये नेहमीच उत्साहाचे वातावरण असते. त्यामुळे या रक्तदान शिबिरास पेठ येथील शिक्षकांचा सहभाग न मिळता तरच नवल ! उत्स्फुर्तपणे शिक्षकांनी यावेळी रक्तदान केले .सिविल हॉस्पिटल ,नाशिक येथील रक्तपेढी तील कर्मचारी व डॉक्टर्स यांचे या कामी सहकार्य लाभले.

 उल्लेखनीय बाब म्हणजे "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले "या म्हणी प्रमाणे माननीय जगताप मॅडम यांनी ही यापुर्वी रक्तदान केलेले असून त्या नेहमीच रक्तदान करण्यात आघाडीवर असतात. त्यांनी यापूर्वी सात वेळा रक्तदान केलेले असुन याहिवेळी रक्तदानासाठी शिक्षकांना प्रोत्साहित करण्याचे त्यांचे कार्य अव्याहतपणे चालुच होते.

...काही क्षणचित्रे ...













Comments

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई