डेरापाडा जि.प.शाळेत टॕबचे उदघाटन
रुहानी मिशन संस्था,देवळाली यांच्यामार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डेरापाडा येथील विद्यार्थ्यांसाठी सॅमसंग कंपनीचा दर्जेदार टॅबलेट शाळेसाठी भेट म्हणून दिला ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत 19 हजार रुपये इतकी आहे.
यासोबतच संस्थेच्या सदस्यांनी शाळेतील मुलांना 15 प्रकारच्या विविध वस्तूही भेट म्हणून दिल्या.त्यामध्ये उत्तम प्रकारची बांधणी असलेले दप्तरे,3 प्रकारची बिस्किटे,पेन्सिल,खोडरबर,वह्या, स्केचपेन,रंगखडू,कंपासपेटी, चित्रकललेची वही,सर्व विद्यार्थ्यांसाठी चॉकलेट तसेच खाऊ व कुरकुरे दिले.
यासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत गावातील सर्व लोकांना कपडे तसेच शालेय मुलांना देखील कपड्यांचे वाटप त्यांनी केले आणि गावातील गोरगरीब व्यक्तींना किरकोळ किराण्याचे वाटप देखील संस्थेमार्फत करण्यात आले.
येतानाच संस्थेच्या सदस्यांनी गावातील सर्व लोक,विद्यार्थी या सर्वांसाठी स्वादिष्ट पुलाव देखील बनवून तो गरम पॅक करून आणला होता,त्याचे देखील आज डेरापाडा गावामध्ये वाटप करण्यात आले.
अशाप्रकारे नवा टॅबलेट व इतर पंधरा प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू आज शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या.यावेळी सावन कृपाल रुहानी मिशन आणि दर्शन अॕकॅडमी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल,शाखा देवळाली कॅम्प,नाशिक यांच्या वतीने सितल नागदेव,माया निहलानि,कौशल्या नागदेव उपस्थित होते. पेठ येथील योगेश राऊत यांनी साहित्य मिळवून देण्याकामी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री सुहास कोळेकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी श्री सावळीराम पडेर,कृष्णा जाधव, सिताराम जाधव ,देविदास खाडम, नामदेव राऊत ,संतोष देशमुख यांच्यासह गावातील बहुसंख्य ग्रामस्थ व महिला व उपस्थित होते.

Comments