मोबाईल स्क्रीन कास्टिंग कशी कराल ?
शाळेमध्ये जर प्रोजेक्टर असेल आणि जर प्रोजेक्टर ने तुम्हाला मोबाईल स्क्रीन कास्टिंग करून मोठ्या पडद्यावर दाखवायचा असेल तर त्यासाठी क्रोम कास्ट किंवा मीरा कास्ट किंवा एनी कास्ट या नावाचे एक छोटे डिवाइस मिळते , त्याची किंमत हजार ते बाराशे पर्यंत असते, ऑनलाइन घेतलं तर 800 रुपयापासून पुढे ते मिळतात .
प्रोजेक्टरच्या एचडीएमआय पोर्टला हे क्रोम कास्ट किंवा एनिकास्ट किंवा मीरा कास्ट लावायचे व चार्जरच्या चार्जिंग सॉकेटला त्याची पावर केबल लावून बटन चालू करून घ्यायचे व प्रोजेक्टर देखील चालू करायचा . दोन्ही चालू केल्यानंतर प्रोजेक्टरच्या मोठ्या पडद्यावर मीरा कास्ट किंवा क्रोमकास्ट किंवा एनी कास्टचं पेज दिसतं. आता ज्या मोबाईल ने तुम्ही स्क्रीन मिरर करणार असाल , त्या मोबाईलचे पहिल्यांदा वाय-फाय ऑन करून घ्यावे. त्यानंतर मोबाईल मधील स्क्रीन कास्टिंग किंवा स्क्रीन मिररिंग हा ऑप्शन चालू करावा. चालू केल्यानंतर तेथे तुम्हाला तुमच्या क्रोम कास्ट किंवा मिराकास्ट किंवा एनीकास्टचं नाव मोबाईल वरती दिसेल ,त्या नावाला तुम्ही क्लिक करायचं आहे.
नावाला क्लिक केल्यानंतर लगेचच प्रोजेक्टरवर तुम्हाला तुमचा मोबाईल जशास तसा दिसायला सुरू होईल. आता तुम्ही मोबाईलवर जे जे कराल, ते ते तुमच्या प्रोजेक्टरवर दिसायला सुरू होईल .अधिक चांगला व्ह्यू मिळण्यासाठी मोबाईल उभा धरण्याऐवजी आडवा मोबाईल धरला तर मोबाईलमध्ये तुम्ही करत असलेली प्रत्येक कृती प्रोजेक्टरच्या भल्या मोठ्या स्क्रीनवर दिसेल.
*जर मोबाईलला स्क्रीन मिररिंग ऑप्शन चालू करून देखील तुमच्या क्रोम कास्ट किंवा मीरा कास्ट किंवा एनी कास्टचं नाव येत नसेल तर तुमच्या क्रोम कास्ट किंवा मीरा कास्ट किंवा एनी कास्टचं तेथे एक पॉवर ऑनचं बटन देखील असतं छोटसं, ते चालू करायचं आधी*.
आणि जर मोबाईल तुम्हाला टीव्हीवर मिरर करायचा असेल तर टीव्ही तुमचा अँड्रॉइड टीव्ही असणे आवश्यक आहे ,
अँड्रॉइड टीव्ही ला काहीही करायची गरज लागत नाही ,फक्त तुमच्या मोबाईलमधील वायफाय ऑन करावे, त्यानंतर मोबाईल मधील स्क्रीन मिररिंग हा ऑप्शन चालू करावा. चालू केल्यानंतर लगेचच तुमच्या मोबाईलचे नाव टीव्ही वरती दिसेल .त्याला एक्सेप्ट करावे . त्यानंतर अँड्रॉइड टीव्हीवर तुमचा मोबाईल दिसायला सुरू होईल.




.jpeg)



Comments