श्री काशिनाथ कदम यांच्यातर्फे डेरापाडा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,डेरापाडा,तालुका -पेठ येथे मा.श्री काशिनाथ कदम यांच्यातर्फे शाळेमधील 23 विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या स्कूल बॅगचे आज वाटप करण्यात आले.

           स्वतः अत्यंत खडतर परिस्थितीतून परिश्रम करून,गोरगरिबीच्या अनंत यातना व झळा सोसून त्यातून तावून-सुलाखून वर आलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे श्री काशिनाथ कदम मामा.  काशिनाथ कदम मामांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक सुरेख पैलू म्हणजे अडचणीत आलेल्यांना, गोरगरिबांना निस्वार्थ भावनेने मदत करण्यात यांचा पुढाकार असतो. कोरोना काळामध्ये नाशिकमध्ये यांनी अन्नदानाचे खूप महत्त्वाचे कार्य केले होते. 

         डेरापाडा हे गाव प्रामुख्याने शेती व शेतमजुरी करणाऱ्या तसेच स्थलांतराचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या गावांपैकी एक आहे. वर्षभर गावामध्ये केवळ महिला व वृद्ध व्यक्तीच दिसून येतात .कारण सर्व तरुण ,स्त्री-पुरुष तसेच वयात आलेली सर्व मुले सह्याद्री ,त्र्यंबकेश्वर येथे कामासाठी जातात व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये द्राक्षबागांवरती काम करून पैसे कमवण्यासाठी विखुरलेले असतात. त्यामुळे साहजिकच गावामध्ये वर्षभर कोणीही व्यक्ती दिसत नाही .त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होताना दिसून येतो .कारण शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षण व इतर बाबींकडे लक्ष द्यायला कोणीही नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तिव्र हेळसांड होते. नेमकी हीच बाब हेरून शाळेतील मुख्याध्यापक श्री. कोळेकर सर यांनी शाळेमधील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त भौतिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आजपर्यंतच्या प्रयत्नांमधील हा देखील एक छोटासा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला माननीय काशिनाथ कदम मामा यांनी एक सुरेख कोंदण उपलब्ध करून देत शाळेतील विद्यार्थ्यांना गरजेची असलेली एक मदत म्हणजे स्कूल बॅग उपलब्ध करून दिल्या. यासाठी नाशिक मधील एम के बॅग हाऊस येथून उत्तम दर्जाच्या स्कूल बॅग त्यांनी खरेदी करून मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केल्या व एका दिमाखदार कार्यक्रमामध्ये गावातील समाज मंदिरामध्ये यांचे वाटप करण्यात आले .

            या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सरपंच माननीय मोहनराव कामडी यांनी भविष्यात कुंभाळे ग्रामपंचायत मध्ये करावयाच्या कामकाजांबद्दलचा आढावा चामरलेणी ट्रेकर्स ग्रुपच्या सदस्यांना बोलून दाखवला तसेच त्यांचे मार्गदर्शन घेत आशीर्वाद देखील घेतला.           

          कार्यक्रमाप्रसंगी काशिनाथ कदम यांच्याकडून डेरापाडा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी *उत्तम दर्जाच्या स्कूलबॅग सोबतच वॉटर बॉटल तसेच प्रति विद्यार्थी दोन पेन देखील देण्यात आले .सोबतच त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खाऊ म्हणून बिस्किटे व कॅडबरी देखील आणलेल्या होत्या* .सरपंचांनी देखील यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी यांना केळीचे वाटप केले.कार्यक्रमाच्या शेवटी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा जाधव यांच्या घरी *चामरलेणी ट्रेकर्स ग्रुपच्या सदस्यांना मिष्टान्न भोजनाचे निमंत्रण होते व संपूर्ण जेवणाचा मेनू अगदी ग्रामीण भागातील बिना खताच्या भाज्या म्हणजेच वास्त्या म्हणजेच बांबूची भाजी, खडकतेरीच्या पातवड्या ,उडदाच्या डाळीचा भुजा ,नागलीची भाकर, लसणाची चटणी व ठेचा असा झणझणीत मेनू होता* .

      *कार्यक्रमातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेरापाडा शाळेतील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी जिला दोन्ही पायाच्या तळपायांना जन्मजात शारीरिक व्याधी आहे अशा विद्यार्थिनीचे पालकत्व काशिनाथ कदम मामा यांनी स्वीकारत तेथेच घोषणा केली की या विद्यार्थिनीला वय वर्ष अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत तिच्या शैक्षणिक पूर्ण पालकत्वाची जबाबदारीची बबन मामांनी घेत उपस्थितांची मने जिंकून घेतली*. तसेच बबन मामांनी त्यांच्या जिव्हाळ्यातील मित्रांना देखील विनंती करीत डेरापाडा शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यासाठी उपयुक्त सामाजिक कार्य करण्याची त्यांना विनंती करत शिफारस देखील केली .

            एकंदरीतच आजचा हा शैक्षणिक कार्यक्रम अत्यंत दिमाखदार अशाच स्वरूपात पार पडला .याबद्दल माननीय काशिनाथ कदम ,माननीय शिवाजीराव पारधी, माननीय किसनराव काकड ,माननीय प्रशांत भाऊ करपे तसेच कदम मामी या सर्वांचे शतशः जाहीर जाहीर आभार.

      सदर कार्यक्रमासाठी मा.काशिनाथ कदम हे सपत्निक उपस्थित होते तसेच चामरलेणी ट्रेकर्स ग्रुपचे उत्साहि सदस्य माननीय शिवाजी पारधी, माननीय किसन काकड ,मा.प्रशांत कर्पे हेदेखील उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री कृष्णा जाधव व डेरापाडा गावातील बहुसंख्य ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री कोळेकर सर यांनी केले तर अध्यक्ष निवड ,अनुमोदन व आभार प्रदर्शन सहशिक्षक मा.सावळीराम पडेर यांनी केले.

      कार्यक्रमास उपस्थित सदस्य :- 

श्री.मोहनजी कामडी(सरपंच),युवराज भोये सदस्य,सौ.लक्ष्मीबाई खानझोडे सदस्या,कृष्णा जाधव शा.व्य.स.अध्यक्ष,लक्ष्मण गावित,उत्तम जाधव,तुळशिराम खाडम,छबिलदास राऊत,शिरिष गावित,अविलदास खाडम,विष्णू जाधव,महेश भवर,मनोहर गावित,छगन जाधव,दिगंबर गायकवाड,एकनाथ भोये (बोरीचीबारी)इ.

          *शालेय साहित्य वाटपाच्या या कार्यक्रमाचे प्रमुख दाते माननीय बबन मामा तसेच चामरलेणी ट्रेकर्स ग्रुप चे आजचे उपस्थित सदस्य किसन आण्णा, शिवा बाबा तसेच प्रशांत भाऊ यांचे मी शाळाप्रमुख म्हणून शतशः आभार व्यक्त करतो.यांच्या ऋणातून उतराई होणे मला कधीही शक्य नाही*.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


काही  क्षणचित्रे
























Comments

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई