डेरापाडा येथे ABP सोशल ऑर्गनायजेशनमार्फत दिवाळी फराळाचे वाटप
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डेरापाडा. केंद्र - कुंभाळे , तालुका - पेठ येथे "अरुण बाबुराव पवार सोशल ऑर्गनायझेशन , नाशिक " यांच्यामार्फत डेरापाडा गावातील 24 विद्यार्थी तसेच गावांमधील 65 कुटुंबातील साधारणतः 300 च्या जवळपास नागरिक यांना दिवाळीपूर्वी सुग्रास फराळाचे वाटप करण्यात आले.
पेठ तालुक्यामधील डेरापाडा हे आदिवासीबहुलवस्तीचे अतिशय दुर्गम असे गाव आहे .ज्या गावांमध्ये पोहोचणेच अत्यंत जीकीरीचे आहे अशा गावांमध्ये म्हणावी तितकी सुधारणा व विकास आजही झालेला दिसून येत नाही. पाण्याचे कायमचे दुर्भिक्ष असलेल्या या गावाला आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच उपजीविकेचे साधन नसल्यामुळे येथील बहुतांशी नागरिक वर्षभरातील सात ते आठ महिने जिल्ह्यात बाहेरच स्थलांतरित होऊन कामासाठी वणवण फिरत राहतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत कमी असल्यामुळे ,कमी वार्षिक उत्पन्न असल्यामुळे सण - उत्सव हव्या त्या उत्साहाने साजरी करता येणे शक्यच नसते .नेमकी हीच बाब हेरुन "अरुण बाबुराव पवार सोशल ऑर्गनायझेशन, नाशिक " या संस्थेच्या सदस्यांशी संपर्क साधला असता श्री विजय दंडवते व श्री राहुल पवार यांनी डेरापाडा या गावातील सर्वच विद्यार्थी व नागरिक यांचे करिता उत्तम दर्जाच्या ताज्या फराळाच्या पदार्थांचे नियोजन करीत असल्याचा मनोदय बोलून दाखवला .जवळपास 11,000 ते 12,000 रुपये किमतीचा विविध प्रकारचा दिवाळी फराळ त्यांनी बनवून आज डेरापाडा येथील विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यामध्ये वाटप केला .दिवाळीपूर्वी हा फराळ वाटप झाल्यामुळे संपूर्ण गावांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आपल्या आनंदात सहभागी करून घेतल्याबद्दल डेरापाडा येथील ग्रामस्थांनी अरुण बाबुराव पवार सोशल ऑर्गनायझेशनचे हार्दिक आभार देखील व्यक्त केले. सोशल ऑर्गनायझेशन मार्फत विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्यासाठी काही जीवनावश्यक वस्तू ,कपडे यांचे देखील दान यावेळी करण्यात आले .सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरूण बाबुराव पवार सोशल ऑर्गनायझेशन नाशिकचे अध्यक्ष राहूल अरुण पवार ,कार्यकारी अध्यक्ष विजय सुभाष दंडवते ,मिथीलेश खैरनार ,संदीप बोडके ,अतुल वाघ ,किरण काकड ,प्रवीण देशमुख ,संभाजी अनुसे,हर्षद कुलकर्णी ,प्रणव कर्नाटककर,गौरव खांदवे ,मयुर लोखंडे,दिपक मोराडे ,शरद ओझरकर ,रवि आढाव,बाळा क्षिरसागर ,सचिन आढाव,राजेश आहेर आदि सदस्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री सुहास कोळेकर सर यांनी केले तर अनुमोदन व आभार प्रदर्शन सहशिक्षक श्री सावळीराम पडेर सर यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी गावातील कृष्णा जाधव, रमेश राऊत, नामदेव राऊत ,सुनील गावित, मनोहर गावित ,हिरामण खाडम, हेमराज जाधव यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व बहुसंख्य महिला , ग्रामस्थ उपस्थित होते. गरजू आदिवासी दुर्गम भागामध्ये अशा प्रकारचा हा उपक्रम साजरा केल्यामुळे "अरुण बाबुराव पवार सोशल ऑर्गनायझेशन नाशिक" चे सर्व स्तरांमधून कौतुक केले जात आहे.
*** काहि क्षणचित्रे ***















Comments