गिनिज रेकॉर्ड आणि भारतीय स्त्रिया.
गिनिज रेकॉर्ड भारतीय स्त्रियांच्या खिशात (डोनेट केलेल्या काही फोटोंसह).
अवल | 31 January, 2016 - 10:33
ऑगस्ट 2015पासून सुरू असलेले प्रयत्न आज साजरे झाले 
गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड साठी जगातील सर्वात मोठे ब्लँकेट भारतीय स्त्रियांनी आज पूर्ण केले. 11148 स्क्वेअर मीटर इतके मोठे ब्लँकेट आज भारतीय स्त्रियांनी विणून पूर्ण केले. आज सकाळी चेन्नई इथे हे रेकॉर्ड गिनिजच्या माननीय सदस्यांनी जाहीर केले
मला खूप आनंद होतो सांगायला की मी, माझी आई, माझ्या बहिणी, मैत्रिणी, येथील निर्मला, संपदा आणि हजारो भारतीय महिलांनी या उपक्रमात मनापासून सहभाग घेतला होता. ऑगस्ट पासून जानेवारी पर्यंत हा उपक्रम चालू होता.
मनात आणलं तर महिला काय करू शकतात याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. चेन्नईच्या सुबश्री नटराजन यांचे समर्थ नेतृत्वाखाली आणि अत्यंत कुशल प्रशासनाखाली अनेक अनोळखी महिला एका झेंड्या खाली एकत्र आल्या; मदर्स इंडिया क्रोशे क्विन्स! फेसबुक, व्हॉट्स अप अशा माध्यमांतून आणि प्रत्यक्ष गाठीभेटीतून हा समान धागा गुंफला गेला, आणि त्यातून विणले गेले हे जगातील सर्वात मोठे, महाप्रचंड ब्लँकेट!
सुरूवातीला केवळ 5000 स्क्वेअर मीटरचा टप्पा अपेक्षित होता. प्रत्यक्षात हा टप्पा सहज ओलांडला गेला, नव्हे दुपटीपेक्षा जास्त संख्येने पार पडला.
या सोहळ्याची ही काही क्षण चित्रे!
सुबश्री मॅम, चेन्नईची टीम आणि जगभरातील सर्व सख्यांना खूप खूप अभिनंदन आणि खुप सगळे धन्यवादही___/\___

Comments