विषयमित्र, जि.प.शाळा,डेरापाडा.

आमचा विषयमित्र उपक्रम:जि.प.शाळा , डेरापाडा 
आमच्या उपक्रमांसंदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हे नेहमीच सिद्ध झाले आहे की ,कोणतीही व्यक्ती आपल्या समवयस्क व्यक्तींमार्फत अधिक लवकर पुढील क्रिया व गोष्टी व कुठल्याही प्रकारचे नवीन ज्ञान लवकर आत्मसात करत असते. नवनवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी आसुसलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तर ही गोष्ट अगदी तंतोतंत लागू पडते. बाल मानस शास्त्र असे सांगते की विद्यार्थी शिक्षकांपेक्षा किंबहुना शिक्षकांनी शिकवलेल्या ज्ञानापेक्षा त्यांच्या वयोगटातील इतर मुलां मार्फत अधिक लवकर कुठल्याही प्रकारचे ज्ञान आत्मसात करून घेतात. असे म्हटले जाते की शिक्षकाने शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांशी मुलाच्या आईप्रमाणे वागले पाहिजे. यापुढे जाऊन मी तर असे म्हणेन की शिक्षकाने शाळेमध्ये अध्यापन करताना विद्यार्थ्यांशी विद्यार्थीच होऊन वागायला हवे ,त्याच्या वयोगटाशी अनुरूप होऊनच समरस व्हायला हवे. बाल मानसशास्त्र तसेच अभ्यासक्रम निर्मिती करणाऱ्या विविध संस्था ,संघटना तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध व्यक्तींनी हि गोष्ट निर्विवादपणे मान्य केलेली आहे. तद्नुसार विविध शाळांमध्ये ,संस्थांमध्ये ,शैक्षणिक विविध संस्थांमध्ये सुद्धा या प्रकाराची तीव्रतेने जाणीव करून घेऊन शैक्षणिक कार्य केले जाते. बालवयात मनामध्ये रुजलेली कुठलीही गोष्ट आयुष्यभर त्या बालकाच्या कायम स्मरणात राहते.किंबहुना त्याच्या जडणघडणीमध्ये हातभारच लावत असते .त्यामुळेच बालकांची निगडीत या विविध संकल्पनांचा शाळांमधून अवलंब होणे व ती वापरली जाणे ही काळाची गरज ठरते.

 या उपक्रमाचे गांभीर्य लक्षात घेता शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती उंचावण्यासाठी मी हा उपक्रम माझ्या वर्गामध्ये राबविण्याचा व तो यशस्वी करण्याचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत इयत्ता तिसरी व इयत्ता चौथी मधील असे विद्यार्थी निवडले की जे त्यांच्या वयोगटातील विद्यार्थ्यांपेक्षा हुशार तर आहेतच परंतु जे त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी सक्षमपणे पार पडू शकतात तसेच ज्यांच्या या शैक्षणिक वर्गाच्या क्षमता पूर्ण झालेल्या आहेत. अशा विषय मित्रांवर काही सोपी जबाबदारी निश्चित करून देण्यात आली. उपचारात्मक अध्यापन करण्यासाठी अशा विद्यार्थ्यांना शाळा भरायच्या आधी एक तास व शाळा सुटल्यानंतर एक तास तसेच सुट्टीच्या दिवशी गावातील समाज मंदिरामध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून दिलेले विषय व घटक इतर विद्यार्थ्यांना समजावून देण्याची व त्यांचेकडून सराव करून घेण्याची जबाबदारी देण्यात आली. आपल्यातीलच एक विद्यार्थी, आपलाच सवंगडी आपल्याच बोलीभाषेतून आपल्यालाच शिकविणार ,अध्यापन करणार या संकल्पनेतून सर्वच विद्यार्थी अगदी उत्साहित झालेले आढळून आले. सुरुवातीच्या काळात केवळ भाषा विषय म्हणजेच मराठी ,इंग्रजी त्यासोबतच गणित या विषयांच्या त्या-त्या वर्गांच्या क्षमता पूर्ण करण्याकडे अधिकाधिक भर दिला गेला.

 मराठीमधील वाचन या प्रक्रियेनंतर आता आम्ही श्रुतलेखन या प्रक्रियेवर यशस्वीपणे विषयमित्रांच्या माध्यमातून काम केलेले असून आता सद्यस्थितीला इंग्रजी या विषयातील वाचन व संभाषण या क्रियांवरती काम चालू आहे. अगदी कमी कालावधीमध्ये आम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळाले असून आज रोजी विद्यार्थी छान प्रकारे इंग्रजीमधून वाचन तर करू लागलेले आहेतच त्याचसोबत तोडकेमोडके संवाद देखील बोलू लागले आहेत. मला आशा वाटते की विषयमित्र या आमच्या उपक्रमामुळे आमच्या शाळेची गुणवत्ता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.

Comments

खूपच छान आण्णा
आण्णा खूपच छान उपक्रम
खुपच छान उपक्रम 👌👌👍
Anonymous said…
खुपच छान उपक्रम 👌👌

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई