जि.प.शाळेत वृक्षारोपण
समाजात आजही अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्या समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपल्या स्वतःच्या इच्छा - आकांक्षांना मुरड घालून सामाजिक उत्तम - उत्तम कार्य करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असताना दिसून येतात.कुणी रक्तदान करतं, कोणी अवयव दान करतं, कोणी नेत्रदान करतात तर कोणी अनाथाश्रम - वृद्धाश्रमामध्ये आपली भरघोस मदत करतात. आजकाल ग्लोबल वार्मिंगची तसेच वाढत्या उष्णतेची समस्या लक्षात घेता वृक्ष लागवड व वृक्षांचे संगोपन ही आज काळाची गरज बनताना दिसत आहे.तसेच यासाठी काम करणाऱ्या अनेक सेवाभावी सामाजिक संस्था तसेच अनेक एनजीओ सुद्धा या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी उतरलेले दिसून येतात. परंतु व्यक्तीशः काम करणाऱ्या व्यक्ती या समाजामध्ये कमीच आढळून येतात .
त्यापैकीच एक म्हणजे श्री नागनाथ शिवाजी कुठार. सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेल्या श्री नागनाथ यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतर अवाजवी गोष्टींवर होणारा अवास्तव खर्च टाळून उपयुक्त सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,डेरापाडा या दुर्गम - अतिदुर्गम शाळेमध्ये वृक्षारोपण करता यावे यासाठी 2100 रुपयांची भरघोस मदत देत नाशिक मधील बाबुलाल नर्सरी येथून उत्तम प्रतीची विविध शोभेची रोपे घेऊन देत वृक्ष लागवडीसाठी व वृक्षारोपणासाठी प्रोत्साहन दिल्या असून सर्वांना पुरस्कृत केलेले आहे. आज अशा प्रकारच्या अनेक व्यक्तींनी समोर येत वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज बनलेली आहे.
या कामी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,डेरापाडा, तालुका पेठ येथील उपक्रमशील मुख्याध्यापक श्री सुहास श्रीरंग कोळेकर व उपशिक्षक श्री सावळीराम सिताराम पडेर यांचे सहकार्य व प्रेरणा भेटली.







Comments