डेरापाडा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
समाजाबद्दल कृतज्ञता बाळगून आपण ज्या समाजातून वर आलो,तेथील रांजल्या - गांजल्यांच्या उदात्त कृत्यामधून उतराई होण्यासाठी अनेक व्यक्ती समाजात कार्य करत असतात. सामाजिक जीवनात वावरत असताना आपले पद सांभाळून सामान्यातल्या सामान्य व्यक्तीच्या हितासाठी कार्य करणाऱ्या मोजके व्यक्तींपैकी एक म्हणजे आमचे परममित्र व सध्या सिएट टायर्स या कंपनीमध्ये नाशिक येथे प्रोडक्शन मॅनेजर या पदावर काम करणारे माननीय नितीन जी हरिभाऊ कोल्हे.
आज माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,डेरापाडा ,केंद्र कुंभाळे, तालुका पेठ ,जिल्हा नाशिक येथे नाशिक येथील सिएट कंपनीमध्ये प्रॉडक्शन मॅनेजर या उच्च पदावर कार्यरत असणारे माझे परममित्र माननीय नितीनजी हरिभाऊ कोल्हे व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.पल्लवीताई नितिन कोल्हे यांच्यातर्फे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उत्तरदायित्वाची भावना ठेवत शाळेतील 24 विद्यार्थ्यांसाठी वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक स्टेशनरी साहित्य( चार रेघी,दुरेघी,एकरेघी वह्या,चित्रकला वह्या,पेन,पेन्सिल,खोडरबर,शार्पनर)आज भेट म्हणून देण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण वर्षभर पुरेल इतक्या या शैक्षणिक स्टेशनरी साहित्याची किंमत जवळपास 7000 इतकी आहे. सदर कार्यक्रमासाठी डेरापाडा शाळेचे मुख्याध्यापक श्री सुहास श्रीरंग कोळेकर ,उपशिक्षक श्री सावळीराम पडेर, सिताराम जाधव, चंदर राऊत, छगन जाधव,श्याम राऊत, शिरीष गावित, रमेश जाधव, उषाबाई जाधव, शोभा जाधव, सुशीला राऊत, मीना खाडम, कौशीबाई राऊत, हौशीबाई खाडम व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते .
**************







Comments