डेरापाडा शाळेत शुजचे वाटप
आज दिनांक ७ जुलै २०२३,वार - शुक्रवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डेरापाडा ,केंद्र-कुंभाळे, तालुका - पेठ ,जिल्हा नाशिक येथे नाशिकमधील सुप्रसिद्ध बांधकाम साहित्य व्यावसायिक माननीय कैलासजी तांदळे साहेब यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डेरापाडा,ता:- पेठ येथील सर्व २४ विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचे दर्जेदार शूजचे वाटप करण्यात आले.
अतिदुर्गम भागामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रती माननीय कैलासजी तांदळे साहेब यांना नेहमीच आत्मियता,सहानुभूती राहिलेली आहे. त्यांच्या मते "आदिवासींचा विकास करावयाचा असेल, तर शिक्षणाच्या मूलभूत सोयी सुधारल्या पाहिजेत".या हेतुनेच मागील वर्षीसुद्धा माननीय तांदळे साहेबांनी माझ्या जिल्हा परिषद शाळा, डेरापाडा येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक स्टेशनरी साहित्याचे वाटप केलेले होते . बांधकाम साहित्य हा त्यांचा व्यवसाय जरी असला तरी , आधीपासूनच ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहिलेले आहेत. तांदळे साहेबांच्या वडीलांनी मुळात शिक्षक व नंतर मुख्याध्यापक म्हणून सेवा दिलेली असल्यामुळे साहजिकच तांदळे साहेबांना शिक्षण,शिक्षक तसेच आदिवासी भागांमधील प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी व नागरिक यांच्याप्रती नेहमीच आत्मीयतेची भावना राहिलेली आहे . याचाच एक भाग म्हणून त्यांनी माझ्या डेरापाडा शाळेमधील २४ विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचे लँन्सर कंपनीचे शूज वाटप करण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली होती.
डेरापाडा गावातील समाज मंदिरामध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला . या कार्यक्रमासाठी माननीय तांदळे साहेब सहपरिवार उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री सुहास श्रीरंग कोळेकर देखील सहपरिवार उपस्थित होते.सोबतच सहशिक्षक श्री सावळीराम पडेर, गावातील ज्येष्ठ श्री सीताराम जाधव , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री कृष्णा भाऊ जाधव यांच्यासह बहुसंख्य स्त्री व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी गावातील तरुण वर्ग, पुरुष मंडळी ,ज्येष्ठ सहकारी व ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व अध्यक्ष ,डेरापाडा यांचे विशेष सहकार्य लाभले. डेरापाडा व आजूबाजूच्या परिसरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
"तळागाळातील व्यक्तींच्या उद्धारासाठी अशा अधिकाधिक व्यक्ती व संस्थांनी पुढे येण्याची गरज आज समाजातून बोलून दाखवली जात आहे".
****** काही क्षणचित्रे ******













Comments