डेरापाडा येथे देवा ग्रुपतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
शैक्षणिक स्टेशनरी उपयुक्त साहित्य वाटप कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डेरापाडा येथे संपन्न
आज दिनांक- 12 जुलै 2023 ,वार- बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डेरापाडा येथे देवा ग्रुप फाउंडेशन चे तालुका अध्यक्ष व सदस्य यांच्यामार्फत जिल्हा परिषद शाळा ,डेरापाडा येथील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम समाज मंदिरामध्ये पार पडला.माझ्या माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेत देवा फाउंडेशन, तालुका पेठ येथील सदस्यांना डेरापाडा येथे पाचारण करत त्यांच्या हस्ते साहित्य वितरणाचा कार्यक्रम आनंदामध्ये पार पडला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सदस्यांनी स्व-खर्चाने विद्यार्थ्यांसाठी दिलेली ही शैक्षणिक भेट या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाचा क्षण होता. आपण ज्या शाळांमधून शिक्षण घेतो आहोत त्या शाळांच्या प्रति उपकृत होण्याच्या भावनेतूनच सदस्यांनी या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन उत्स्फूर्तपणे केलेले होते.
या कार्यक्रमास देवा ग्रुप तालुका अध्यक्ष श्री विजयजी माळेकर,देवा ग्रुप सदस्य , डेरापाडा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा जाधव, सदस्य ,नामदेव राऊत,गावातील ज्येष्ठ मंडळी, तरुण वर्ग व मुख्याध्यापक श्री सुहास श्रीरंग कोळेकर उपस्थित होते.
***** काहि क्षणचित्रे *****





Comments