डेरापाडा , पिठुंदि , घुबडसाका येथील विद्यार्थ्यांना " रोटरी क्लब नाशिक " मार्फत नव्या सायकलींचे वाटप

 


         रोटरी क्लब नाशिक मार्फत सायकल वाटप

                     आज दिनांक ०१ जुलै २०२३,शनिवार रोजी झेनिथ मेटाप्लास्ट,सातपुर MIDC,नाशिक येथे माझे परममित्र व नाशिक बिजनेस असोसिएशनचे अध्यक्ष तसेच रोटरी क्लब ऑफ नाशिकचे क्रियाशील सदस्य मा.विक्रमजी खैरनार व श्री.विजयजी दिनानि यांच्या मदतीतून रोटरी क्लब ऑफ नाशिक मार्फत माझ्या डेरापाडा गावासाठी(5 सायकल) तसेच घुबडसाका गावासाठी (1सायकल) व पिठुंदि गावासाठी (4 सायकल) या तीन गावांमधील 10 गरजू माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्या,दर्जेदार हर्क्युलिस सायकलिंचे (एका सायकलची किंमत 8800 रु.)आज सातपूर येथे मोठ्या दिमाखदार कार्यक्रमात वाटप करण्यात आले. या 3 गावांमधील 10 विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याचा एक छोटासा भाग बनता आला,याचा मला सार्थ अभिमान वाटतो.सायकल स्वीकारताना पालक व विद्यार्थी,विद्यार्थीनी आनंदित झाले होते.🙏🏻🚲🙏🏻🚲🙏🏻

           मुळातच आदिवासी भागांमध्ये आधीच रस्त्यांची सुविधा म्हणावी तेवढी चांगली नाही .त्यातच दळणवळणाच्या साधनांचा बहुतांशी अभाव आढळतो.अशावेळी मुलांचं शाळेतून गळती व स्थगितीचे प्रमाण यामुळे वाढण्याचा धोका खूप असतो. आणि हाच धोका ओळखून रोटरी क्लब ऑफ नाशिकने जिल्हाभरामध्ये दहा हजार सायकल वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला होता.या सायकलिंची मदत योग्य त्या गरजू व्यक्तीपर्यंतच पोहोचवण्यासाठी माझे मित्र माननीय विक्रमजी खैरनार यांनी घेतलेली मेहनत खूपच वाखाणण्याजोगी अशीच होती.प्रत्येक तालुक्यातील शिक्षकाला संपर्क करून अगदी गरजू अशाच विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचविण्यासाठी त्यांनी व्यक्तिशः संपर्क करून,सर्वच अर्जांची छाननी करून शिक्षणाच्या प्रवाहापासून भावी पिढी दूर राहणार नाही यासाठी खूप कष्ट घेतले.स्वतः या मोठ्या,भव्य दिव्य,दिमाखदार कार्यक्रमास उपस्थित राहता येणार नसूनसुद्धा या कार्यक्रमास प्रत्येक विद्यार्थी,पालक,शिक्षक कसे उपस्थित राहतील याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष पुरविले.त्यामुळे त्यांच्या हस्ते ज्या एकूण 25 सायकली आदिवासी भागांमध्ये वाटल्या गेल्या,त्या विद्यार्थ्यांमधून एखादा विद्यार्थी पुढे चालून भविष्यामध्ये मोठा अधिकारी किंवा मोठ्या पदावर पोहोचला तर त्यामध्येदेखील माननीय विक्रमजींचेच खूप मोठे योगदान आहे हे मानायला हरकत नाही.

         रोटरी क्लबच्या तसेच विक्रमजिंच्या या योगदानाबद्दल आमच्या डेरापाडा, घुबडसाका व पिठुंदि या तीनही गावांमधील ग्रामस्थ,विद्यार्थी व पालक यांनी त्यांचे शतशः आभार मानले.

         सदर कार्यक्रमास खासदार माननीय हेमंत गोडसे,आमदार माननीय सीमाताई हिरे, पोलीस अधीक्षक माननीय शर्मिष्ठा वालावलकर,रोटरीचे सदस्य मा.श्री विजयजी दिनानी यांच्यासह जिल्हाभरातील शिक्षक, पालक ,ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

******
कार्यक्रमाची क्षणचित्रे









   **** धन्यवाद ****

Comments

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई