डेरापाडा शाळेत छत्री वाटप
उपनगर क्रियाशिल फ्रेंड सर्कलमार्फत २५ छत्री वाटप
सामाजिक दातृत्वाची भावना ठेवत आपण ज्या समाजातून जन्मलो ,वाढलो, विकसित झालो, त्या समाजाला हात धरून पुढे नेण्याची जबाबदारी मनामध्ये ठेवून कार्य करणारे व्यक्ती समाजामध्ये फार कमी असतात आणि खऱ्या अर्थाने अशा व्यक्तींमुळेच समाज पुढे जाताना देखील दिसून येतो . देशाच्या प्रगतीचे ,विकासाचे मुख्य आधारस्तंभ अशाच व्यक्ती असतात .ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेनेच उपनगर येथील सरकारी कर्मचारी, व्यावसायिक व इतर उत्साही व्यक्तींचा मिळून *उपनगर क्रियाशील फ्रेंड्स सर्कल* या ग्रुप तर्फे डेरापाडा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आज छत्र्या वाटप करण्यात आल्या.
शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी पावसाळ्यात भिजू नये यासाठीच हा स्तुत्य उपक्रम उपनगर क्रियाशील फ्रेंड यांच्या वतीने राबविण्यात आला.याप्रसंगी कुंभाळे गावचे सामाजिक कार्यात सदैव तत्पर असलेले आमचे मार्गदर्शक श्री मधुकर आवारी सर,आर्वी फार्माचे संचालक श्री संजयभाऊ आरोटे,राष्ट्रपती पारितोषिक विजेते मा.हृदयनाथ साळवी दादा,उपनगर फ्रेंडचे सचिव श्री राज शेख व श्री विकी पंडीत आदिंनी याकामी पुढाकार घेत २५ छत्र्या उपलब्ध करून दिल्या. डेरापाडा शाळेचे मुख्याध्यापक श्री सुहास कोळेकर सर व श्री सावळीराम पडेर सर तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री युवराज भोये यांच्याकडे २५ छत्र्यांचे संच दिले.कुंभाळे ग्रामपंचायतचे उपसरपंच मा.श्री सोमनाथ निकुळे व ग्रामपंचायत सदस्य मा.श्री युवराज भोये,ग्रामपंचायत सदस्या सौ.लक्ष्मीबाई खानझोडे ,मा.भरत पवार यांच्या हस्ते जि.प.शाळा ,डेरापाडा येथे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला .
सदर कार्यक्रमासाठी जनार्दन भवर ,सागर राऊत, नितीन खाडम, सौ तुळसा खाडम ,सौ लीला हेमराज जाधव, श्री तुळशीराम खाडम यांच्यासह मुख्याध्यापक श्री सुहास कोळेकर व सहशिक्षक श्री सावळीराम पडेर उपस्थित होते . यावेळी श्री कोळेकर सर यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन श्री सावळीराम पडेर सर यांनी केले.
***काहि क्षणचित्रे***












Comments