ग्रामपंचायत,कुंभाळे ता.पेठ यांच्यातर्फे डेरापाडा शाळेस स्मार्ट किट प्राप्त

 




                     दुर्गम अशा पेठ तालुक्यामधील नाविन्याचा ध्यास घेतलेली ग्रामपंचायत म्हणजेच कुंभाळे व तेथीलच तितकेच तरुण,तडफदार असे ग्रामपंचायतीचे सर्व कार्यकारी मंडळ.या ग्रामपंचायतीमधील सरपंच माननीय मोहनरावजी कामडी तसेच उपसरपंच श्री सोमनाथजी निकुळे,ग्रामसेविका सौ. देशमुख मॅडम व इतर सर्व सदस्य तरुण असून यांनी पंचायतीमधील सर्व समस्यांचा निपटारा करण्याकडे चंग बांधलेला आहे. ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांमधील सर्व समस्या निराकारणाकडे यांचा कल दिसून येतो. तसेच पंचायती अंतर्गत सर्व गावांमध्ये शिक्षण,आरोग्य.रस्ते व इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याकडे पंचायतीचा भर आहे .

              या अंतर्गतच शाळांना देखील पंचायतीतर्फे स्टेशनरी साहित्य ,स्कूल बॅग ,वॉटर फिल्टर्स यापूर्वी दिलेले आहेत व आज माननीय मोरे साहेब यांच्या संकल्पनेतील स्मार्ट किटचे आज ग्रामपंचायती अंतर्गतच्या शाळांना वितरण करण्यात आले.

               या स्मार्ट किटमध्ये मॅग्नेटिक शाई असलेली पुस्तके देण्यात आली तसेच या पुस्तकांचे वाचन करणारा एक स्मार्ट पेन यासोबत देण्यात आला. हा स्मार्ट पेन केवळ त्या पुस्तकांवरती ठेवल्यानंतर त्या पुस्तकांमधील गाणी ,गोष्टी ,बडबड गीते हा पेन वाचून दाखवतो. या पेनला एक इनबिल्ट स्पीकर जोडलेला आहे. ज्यामधून ठळकपणे आवाज देखील येतो. या स्मार्ट किटमुळे निश्चितच ग्रामपंचायती अंतर्गतच्या सर्व शाळांचा इंग्रजीचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होणार आहे. ग्रामपंचायतीने अशा प्रकारचे साहित्य देण्यासाठी पुढाकार घेतल्याने सर्व स्तरांमधून या ग्रामपंचायतीच्या सदस्य मंडळांचं कौतुक होत आहे व अशा प्रकारचा प्रयत्न सर्व ग्रामपंचायतींनी करावा अशी देखील सर्व स्तरांमधून चर्चा केली जात आहे 

               ग्रामपंचायत, कुंभाळे येथे पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमास ग्रामपंचायत अंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका व ग्रामपंचायत मधील विविध समित्यांचे प्रमुख व सदस्य,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपलब्ध होते.




Comments

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई