जळुंचा हा उपयोग माहित आहे का?

 



 जळू या रक्त पिणाऱ्या सजीवाबद्दल आपण वेगवेगळ्या माध्यमातून नेहमीच ऐकलेले आहे. या लेखामध्ये आपण जळू बद्दल किंवा जळवांबद्दल  माहिती बघणार आहोत.

     सहसा सध्या वैद्यकीय विविध उपचारांमध्ये,रक्ताशी निगडित दूषितपणामध्ये तसेच मेडिकलशी संदर्भित विविध उपचारांमध्ये जळूंचा वैद्यकीय मार्गदर्शनाखाली, डॉक्टरांच्या सूचनेखाली वापर करताना आपल्याला दिसून येतो. जळू या रक्त ,मांस यावरती प्रामुख्याने वाढतात. अगदीच दाट जंगलामध्ये, दलदलीच्या ठिकाणी देखील या जळू आढळतात 

    सजीवाच्या शरीराला चिकटलेली जळू तिचे पोट पूर्णपणे भरेपर्यंत सजीवाच्या शरीरावरून निघत नाही.अशी जळू शरीराला चिकटली तर सुई टोचल्यापेक्षाही कमी वेदना होतात त्यामुळे लवकर समजून येत नाही. अशावेळी मीठ, हळद जर त्या जळू वरती टाकले, त्याच्या तोंडाजवळ टाकले तर ती जळू शरीरापासून दूर होते .मिठामध्ये ठेवलेली जळू लगेचच मरून ही जाते.




     वैद्यकीय उपचारांमध्ये रुग्णाच्या त्वचेच्या खाली किंवा एखाद्या अवयवा जवळ साठलेले दूषित रक्त बाहेर काढण्यासाठी सुरक्षितरित्या जळूचा वापर केला जातो. अशी जळू रुग्णाच्या त्वचेला चिकटवली की ती जळू तेथील दूषित रक्त सर्व पिऊन टाकते. त्यानंतर ती जळू हळदीच्या पाण्यामध्ये बुडवल्यानंतर जळू ते सर्व रक्त ओकून बाहेर काढते. त्यानंतर त्या जळूला पुन्हा स्वच्छ धुऊन साफ पाण्यामध्ये ठेवले जाते, जेणेकरून पुढील रुग्णाच्या उपचारासाठी त्याचा वापर केला जाईल .

    काही जळू विषारी असतात तर काही जळू बिनविषारी या प्रकारात मोडतात .त्यांचाच उपयोग वैद्यकीय उपचारांमध्ये केला जातो.


Comments

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई