100 वर्षांनंतरची शहरे

 

100 वर्षांनंतरची मुंबई

 नवीन जगभरात प्रसिद्ध असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर करून आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे अवतार बनवत असताना बघत असतो .परंतु याच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून शंभर वर्षानंतर भारतातील प्रमुख शहरे कशाप्रकारे आपली कात टाकताना दिसतील याचा एक ढोबळ आढावा घेत काही अगदीच नाविन्यपूर्ण व औत्सुक्याने भरलेली शहरांची इमेजेस बनवण्यात आलेले आहेत ,ज्या आज नेटकऱ्यांमध्ये खूपच व्हायरल होताना दिसत आहेत,त्यातील काही निवडक छायाचित्रे...










Artificial Intelligence काय आहे?

आर्टिफिशयल इंटेलिजन्स हे टेक टिप्स कॉम्प्युटर सायन्स चा एक भाग आहे. एआय ही यंत्रणा, विशेषत: संगणक प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमत्ताचे नक्कल करून काम करते. एआय तंत्रज्ञानाच्या मार्फत कोणतीही मशीन मनुष्या सारखे बोलू, वाचू किंवा कोणतीही गोष्ट सहज समजू शकते.AI चा फुल फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) असा आहे.एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्ते सारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये व त्या मशीन मधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला मराठी मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रात वापर केला जातो.

Comments

Anjali s k said…
Nice one