चारधाम यात्रा प्रारंभ

 



           हिंदूंच्या जन्मामध्ये चारधाम यात्रेला खूप महत्त्व आहे.असं म्हणतात की मृत्यूपूर्वी या चारधाम यात्रा करणे खूप पुण्यकर्म मानले जाते.

     परंतु अत्यंत बर्फवृष्टीमुळे सहा महिने या चारधाम यात्रा बंद असतात तर सहा महिने ही यात्रा सुरू करण्यात येते .येत्या 22 एप्रिल पासून या चारधाम यात्रेस सुरुवात होत असून केदारनाथ ,बद्रीनाथ ,गंगोत्री व यमुनोत्री या चारधाम तीर्थांच्या यात्रा सुरू होण्याच्या तारखा एप्रिल मधीलच आहेत. या चारही धामांचे वेगवेगळे महत्त्व आहे तसेच यांच्या संदर्भातील आख्यायिकाही वेगवेगळ्या आहेत व तितक्याच अनोख्या अशा आहेत .या चारधाम यात्रांपैकी केदारनाथ यात्रा किंवा केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्याची तिथी आहे 25 एप्रिल 2023 . बद्रीनाथ धाम चे कपाट उघडण्याची तिथी आहे 27 एप्रिल तर गंगोत्री व यमुनोत्री या धामांचे कपाट उघडण्याची तिथी असेल 22 एप्रिल 2023 .




      सद्यस्थितीला मूळ मूर्ती ज्या उखीमठ किंवा खालच्या मंदिरांमध्ये आणून ठेवलेले असतात, या मूळ मूर्ती आता त्यांच्या धामांकडे रवाना झालेले आहेत .

       उत्तराखंड यात्रा किंवा चारधाम यात्रा सुरू करण्यापूर्वी या प्रवासाची उत्तराखंडच्या सरकारी वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करणे अत्यावश्यक असते .एप्रिल महिन्यामध्ये उत्तराखंडमध्ये व चारधाम यात्रांच्या ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी असल्यामुळे जाणाऱ्या भाविक पर्यटकांनी तितकी पुरेशी काळजी घेऊन निघणे अत्यंत आवश्यक असते.

             उत्तराखंड हे राज्य पूर्णतः डोंगरी भागात असल्यामुळे येथे भूस्खलनाचे प्रमाण खूपच जास्त आहे तसेच चारही धामांच्या यात्रेवेळी ऑक्सिजनची कमतरता भासू शकते .त्यामुळे याही गोष्टींचा भाविकांनी विचार करणे आवश्यक आहे .उत्तराखंडला देवभूमी असेही म्हणतात. या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची मंदिरे ऐतिहासिक धार्मिक ठिकाणी बघू शकता. ऋषिकेश हरिद्वार या हिंदूंच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्व असणाऱ्या ठिकाणांचा देखील येथे लाभ घेता येऊ शकतो, रिव्हर राफ्टिंग देखील करता येऊ शकते.



Comments

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई